जिल्ह्यात अपुऱ्या आरोग्य सुविधांअभावी ५०० हुन अधिकांचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- जिल्ह्यामध्ये कोविड केअर सेंटर वाढले, कोविड हॉस्पिटलची संख्याही वाढली. जिल्ह्यात तब्बल १६ हजारांपेक्षा जास्त बेड सज्ज आहेत. मात्र, त्याहीपेक्षा सक्रिय रुग्णांची संख्या २२ हजार आहे.

त्यामुळे निम्म्यापेक्षा अधिक रुग्णांना बेड मिळत नसल्याची जिल्ह्यात स्थिती आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे दरदिवशी अनेकांचे मृत्यू होत आहे.

नुकतेच हाती आलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यातच ६९१ जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्दैवी गोष्ट म्हणजे या ६९१ मयत रुग्णानापैकी जवळपास ५०० हुन अधिक रुग्णांना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर मिळाले नाही, त्यामुळे त्यांना साध्या बेडवर उपचार घ्यावे लागले.

उपचार होऊ न शकल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात कोविड केअर सेंटरमध्ये १३ हजार ८२ बेड उपलब्ध आहेत, तर जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात ६८०, तर कोविड हॉस्पिटलमध्ये ५ हजार ४८२ बेड उपलब्ध आहेत.

जिल्ह्यात फक्त ३३६ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. दरम्यान जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने शंभर रुग्णांना पाहण्यासाठी एक ते दोन नर्स, आरोग्य कर्मचारी आहेत.

त्यामुळे एखाद्या रुग्णाला कोणत्या उपचाराची गरज आहे, ते लक्षात येईपर्यंत रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्रकारही घडले आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24