परीक्षेविनाच जिल्ह्यातील तब्बल 9 लाखाहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या प्रदुर्भावामुळे राज्यासह जिल्ह्यात शाळाच भरल्या नाही आहे. कोरोनाचा वाढता कहर पाहता शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या. परीक्षेविनाच २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील ९ लाख ६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

कोरोनाच्या स्थितीमुळे शासनाने पहिली ते बारावी अशा सर्वच वर्गाची परीक्षा रद्द केल्याने हे विद्यार्थी पुढच्या वर्गात गेले आहेत.

सलग गेल्या दोन शैक्षणिक वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. मागील वर्षी मार्च २०२० मध्ये कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा दहावी, बारावीच्या परीक्षा झालेल्या होत्या. दहावीचा केवळ एक पेपर शिल्लक होता.

त्यानंतर पहिली ते आठवी व अकरावीच्या परीक्षा होणे बाकी होत्या. परंतु कोरोनामुळे पुढे लाॅकडाऊन लागल्याने या परीक्षाही रद्द झाल्या. पुढे २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात शाळाच सुरू झाल्या नाहीत.

पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग काही दिवस सुरू झाले. मात्र पुढे ते बंद करण्यात आले. मार्च, एप्रिलमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याने

शिक्षण विभागाने प्रथम पहिली ते आठवी नंतर नववी व अकरावी, तसेच दहावी व बारावी अशा सर्वच वर्गाच्या परीक्षा रद्द केल्या. पुढील प्रवेशासाठी या विद्यार्थ्यांचा आता अंतर्गत मूल्यमापनातून निकाल जाहीर होणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24