अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- शासनात विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील एसटी कर्मचार्यांचा संप सुरू आहे. या संपात नगर जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी झाले होते.(ST employees)
मात्र, मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 143 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 143 प्रशासकीय, यांत्रिकीकरण विभाग आणि चालक-वाहक हे कामावर हजर झालेले आहेत.
यात नगर मुख्यालय, तारकपूर, नेवासा, शेवगाव आणि कोपरगाव डेपोतील कर्मचार्यांचा समावेश आहे. दरम्यान, श्रीरामपूर आगातील यांत्रिकरण विभागालातील एका कर्मचार्याला एसटी महामंडळाकडून बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली असून संबंधीत कर्मचारी हा यांत्रिक विभागातील आहे.
जिल्ह्यात धावतायत 115 एसटी बसेस मागील आवठड्यात जिल्ह्यातील विविध मार्गावरून 110 एसटीच्या बसेस धावत होत्या. त्यात वाढ होवून आता 115 एसटी बसेस जिल्ह्यात धावत आहे. यामुळे काही मार्गावर प्रवाशांना दिलासा मिळतांना दिसत आहेत.