गुरू अर्जन देव कोविड केअर सेंटर मधून तब्बल दीड हजारहून अधिक रुग्ण बरे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत गुरू अर्जन देव सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या गुरू अर्जन देव कोविड केअर सेंटर मध्ये तब्बल दीड हजार रुग्ण कोरोनाने बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा यांनी दिली.

घर घर लंगर सेवेच्या वतीने महापालिकेच्या सहकार्याने हॉटेल नटराज व महिलांसाठी जैन पितळे वसतीगृह येथे निशुल्क कोविड सेंटर सुरु करण्यात आलेले आहे.

आतापर्यंत हॉटेल नटराज येथून 1011 तर जैन पितळे येथून 550 (महिला) असे एकूण 1566 कोरोनाने बरे होऊन घरी परतले आहेत.

हॉटेल नटराज येथे रमेश कोठारी परिवार व जैन पितळे वसतीगृह येथे शांतीबाई फिरोदिया मेमोरियल ट्रस्ट, आय लव्ह नगर यांनी दिलेल्या वस्तूंमुळे हे दोन्ही कोविड सेंटर कार्यरत करण्यात आले होते.

सध्या दोन्ही कोविड सेंटर निशुल्क सेवा देत असून, कोरोनाचे लक्षण आढळल्यास त्वरीत कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी भरती होण्याचे आवाहन लंगर सेवेच्या वतीने करण्यात आले आहे.

दोन्ही कोविड सेंटर चालविण्यासाठी महापालिका आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, आरोग्य विभाग यांचे सहकार्य लाभले. घर घर लंगरसेवेच्या माध्यमातून मागील वर्षापासून अनेक गरजूंना मदत व दोन वेळच्या जेवण देखील पुरविण्याचे कार्य सुरु आहे.

यासाठी पोलीस अधिक्षक मनोज पाटील, पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके, विशाल ढुमे व पोलीस दलाची साथ लाभली. सध्या लंगर सेवा हॉटेल अशोका येथून सुरु आहे. तसेच रुग्णांसाठी ऑक्सिजनची सेवा देखील पुरविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी लायन्स क्लब इंटरनॅशनलचे पदाधिकारी व लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, प्रितपालसिंग धुप्पड, राहुल बजाज, राजेंद्र कंत्रोड, सतीश गंभीर, विपुल शहा, किशोर मुनोत, मनोज मदान,

राहुल शर्मा, नारायण अरोरा, राजभीरसिंग सिंधू, जय रंगलानी, मन्नू कुकरेजा, करण धुप्पड, कैलाश नवलानी, कबीर धुप्पड, सिमर वधवा, सुनिल छाजेड, प्रशांत मुनोत, अनिश आहुजा, राजवंश धुप्पड,

बलजित बिलरा, अर्जुन मदान, सुनिल थोरात, कमलेश गांधी, गुरभेजसिंग बजाज, गौरव नय्यर आदी सेवादार सहभाग नोंदवत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24