Morning Exercise Benefits : तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोज सकाळी करा ‘हा’ व्यायाम, जाणून घ्या सकाळचे सर्वोत्तम व्यायाम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Morning Exercise Benefits : व्यायाम केले तर शरीर निरोगी राहते असे तुम्ही ऐकले असेल. मात्र काही लोक सकाळी व्यायाम न करता संद्याकाळी करत असतात. अशा वेळी तुम्ही सकाळी व्यायाम केल्याचे फायदे जाणून घेतले पाहिजेत.

दरम्यान, सकाळचा व्यायाम हा सर्वोत्तम मानला जातो. कारण सकाळी कोणतीही शारीरिक हालचाल केल्याने एंडॉर्फिन नावाचे हार्मोन वाढण्यास मदत होते, ज्यामुळे मूड सुधारतो.

यासाठी तुम्ही सकाळी शारीरिक क्रिया म्हणून तुम्ही पोहणे, चालणे, धावणे, योगासने इत्यादी करू शकता. निरोगी हृदयासाठी सकाळचा व्यायाम आवश्यक आहे, जाणून घ्या त्याच्याशी संबंधित मुख्य गोष्टी.

निरोगी हृदयासाठी सकाळचा व्यायाम सर्वोत्तम आहे

सकाळी व्यायाम केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. जर तुम्ही सकाळी व्यायामाची सवय लावली तर स्ट्रोक आणि इतर हृदयविकारांची शक्यता कमी होऊ शकते. एवढेच नाही तर हृदयाच्या स्नायूंना बळकटी देते आणि वजन कमी करण्यासही मदत होते. निरोगी हृदयासाठी तुम्ही सकाळी खालील व्यायाम करू शकता.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी सकाळचा व्यायाम

चालणे आणि धावणे: सकाळी वेगाने चालणे आणि धावणे यामुळे हृदय मजबूत होते.

पोहणे : पोहणे हा देखील हृदयासाठी चांगला व्यायाम आहे. संपूर्ण शरीरासाठी हा एक चांगला व्यायाम आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्ही हे देखील करू शकता.

सायकलिंग : सकाळी सायकल चालवल्याने हृदय निरोगी राहते. यामुळे स्नायू मजबूत होतात आणि मनासाठीही फायदेशीर ठरते.

योग : योग हा केवळ हृदयासाठीच नाही तर संपूर्ण शरीरासाठी चांगला मानला जातो. स्नायूंना बळकट करण्यासाठीही हे फायदेशीर आहे. सकाळी अनेक योगासने केल्याने तुम्हाला अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे मिळतील.