Most Expensive Bikes With Indian Cricketers : तुम्हीही अनेकदा क्रिकेटर्सच्या लक्झरी जीवनशैलीबद्दल ऐकले असेल. मात्र अनेक भारतीय क्रिकेटर्सना महागड्या बाईक्स वापरण्याचे शौकीन आहेत. मात्र तुम्हाला त्यातील काही ठराविकच क्रिकेटर्सच्या महागड्या बाईक्सबद्दल माहिती असेल.
तुम्ही महेंद्रसिंग धोनी यांच्या महागड्या बाईक्सबद्दल ऐकले असेल. मात्र महेंद्रसिंग धोनीच नाही तर ८ भारतीय क्रिकेटर्स महागड्या बाईक्स वापरण्याचे शौकीन आहेत. चला तर जाणून घेऊया कोणत्या क्रिकेटर्सकडे कोणती महागडी बाईक आहे.
भारतीय क्रिकेटपटूंच्या सर्वात महागड्या बाइक्स
1. युवराज सिंग
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपट्टू युवराज सिंग याला देखील महागड्या बाईकचा शौकीन आहेत. त्याच्याकडे BMW GR10R बाईक आहे. या बाईकची ऑन रोड किंमत 3.5 लाख रुपये आहे.
2. गौतम गंभीर
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर गौतम गंभीर यांच्याकडे देखील महागड्या बाईक्स आहेत. त्यामधील KTM Duke 390 ही त्याच्याकडील सर्वात महागडी बाईक आहे. या बाईकची किंमत 3.4 लाख रुपये आहे.
3. सौरव गांगुली
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्याकडे देखील महागडी बाईक आहे. BMW G 310 GS ही एक त्याच्याकडील महागडी बाईक आहे. या बाईकची किंमत 4.2 लाख रुपये आहे.
4. प्रज्ञान ओझा
टीम इंडियाचा माजी गोलंदाज प्रज्ञान ओझाही अनेकदा बाईक चालवताना दिसतो. त्यालाही अनके महागड्या बाईक चालवताना पाहिले गेले आहे. त्याच्याकडे हार्ले-डेव्हिडसन स्पोर्टस्टर 48 ही बाईक आहे. या बाईकची किंमत 13 लाख रुपये आहे.
5. नवदीप सैनी
नवदीप सैनी हा टीम इंडियाचा युवा गोलंदाज आहे. त्याच्याकडे महागडी बाईकही आहे. तो हार्ले-डेव्हिडसन रोडस्टरवरून फिरताना दिसतो. या बाइकची किंमत सुमारे 14.5 लाख रुपये आहे.
6. रवींद्र जडेजा
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा जड्डू या नावाने प्रसिद्ध आहे. जेव्हा तो रस्त्यावर असतो तेव्हा तो सुझुकी हायाबुसा चालविण्यास प्राधान्य देतो. त्यांच्या या महागड्या बाइकची किंमत सुमारे १६ लाख रुपये आहे.
7. शिखर धवन
भारताचा सलामीवीर शिखर धवन हा देखील महागड्या बाईक वापरण्याचा शौकीन आहे. त्याच्याकडे सुझुकी हायाबुसा ही टॉप मॉडेल आहे. या स्पोर्ट्स बाईकची किंमत सुमारे 17 लाख रुपये आहे.
8. महेंद्रसिंग धोनी
महेंद्रसिंग यांच्या महागड्या बाईकबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल. धोनीकडे एकापेक्षा एक महागड्या बाईक आहेत. त्याच्या बाईकच्या गॅरेजचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. त्याच्याकडील सर्वात महागड्या बाईकचे नाव Confederate Hellcat X132 आहे. लक्झरी बाईकची किंमत सुमारे 47 लाख रुपये आहे.