Moto G73 : बंपर ऑफर! अवघ्या 549 रुपयांत खरेदी करा मोटोचा शक्तिशाली 5G फोन, कुठे आणि कसा खरेदी कराल? पहा..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Moto G73 : काही दिवसांपूर्वी मोटोने Moto G73 हा स्मार्टफोन लाँच केला होता. या स्मार्टफोनची मूळ किंमत 21,999 रुपये इतकी आहे. परंतु तुम्ही आता तो मूळ किमतीपेक्षा खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. अशी धमाकेदार ऑफर तुमच्यासाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.

फ्लिपकार्टवर मिळत असणाऱ्या वेगवेगळ्या ऑफर्समुळे तुम्हाला हा स्मार्टफोन अवघ्या 549 रुपयांत खरेदी करता येईल. परंतु ही ऑफर काही दिवसांसाठी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला या संधीचा लाभ लवकरात लवकर खरेदी करावा लागणार आहे.

जाणून घ्या ऑफर

या मोटोरोला फोनची मूळ किंमत 21,999 रुपये आहे, परंतु सध्या तो तुम्ही फ्लिपकार्टवर 22% डिस्काउंटनंतर अवघ्या 16,999 रुपयांना खरेदी करू शकता. तसेच या फोनवर बँक आणि एक्सचेंज ऑफर देण्यात येणार आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही तो आणखी कमी किमतीत खरेदी करू शकता.

बँक आणि एक्सचेंज ऑफर

हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला DBS बँक क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 10% (रु. 750 पर्यंत) सवलत देण्यात येत आहे. तसेच तुम्ही Flipkart Axis Bank कार्डवरून पेमेंट केले तर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळेल. कंपनी या फोनवर EMI ऑप्शन देत असून तुम्ही प्रत्येक महिन्याला हा फोन 598 रुपये EMI भरून सहज खरेदी करू शकता.

एक्सचेंज ऑफर अंतर्गत या स्मार्टफोनवर सर्वात मोठी सवलत देण्यात येत आहे. जुना फोन बदलून 16,450 रुपयांपर्यंत तुम्हाला सवलत मिळेल. त्यामुळे, एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा घेऊन तुम्ही हा फोन अवघ्या 549 रुपयांना (16,999-16,450) खरेदी करू शकता.

स्पेसिफिकेशन

या स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा फुल-एचडी + एलसीडी डिस्प्ले देण्यात येत आहे. यात MediaTek Dimensity 930 प्रोसेसर वापरला गेला आहे. स्टोरेजचा विचार केला तर हा 8GB RAM आणि 128GB स्टोरेजसह जोडण्यात आला आहे. तसेच तुम्ही नंतर मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 1 GB पर्यंत वाढवू शकता. हा स्मार्टफोन Android 13 OS सह येतो.

कॅमेरा आणि बॅटरी

कॅमेरा फ्रंट वर, यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP मुख्य कॅमेरासह 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा लेन्सचा समावेश असणार आहे. इतकेच नाही तर सेल्फीसाठी यात 16MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. जोपर्यंत बॅटरीचा संबंध आहे तोपर्यंत त्यात 5000mAh ची शक्तिशाली बॅटरी असल्याने जी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.