Moto Razr 40 : त्वरा करा! 49% सवलतीत मिळतोय ‘हा’ फोल्डेबल फोन, पहा ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Moto Razr 40 : जर तुम्ही नवीन फोल्डेबल फोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आहे. तुम्ही आता Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमधून एक शानदार स्मार्टफोन 49% सवलतीत खरेदी करू शकता.

अशी खास ऑफर तुम्हाला Moto Razr 40 या फोनवर मिळत आहे. येत्या 8 ऑक्टोबरपासून ही सेल सुरु होणार आहे. त्यामुळे तुम्हाला काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. जाणून घेऊयात या फोनचे फीचर्स आणि यावर मिळणारी ऑफर.

8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज असणाऱ्या या फोनची मूळ किंमत 99,000 रुपये इतकी आहे. परंतु या डीलमध्ये 49% डिस्काउंट नंतर तुम्ही तो 49,999 रुपयांना खरेदी करू शकता. बँक ऑफरमध्ये तुम्हाला फोनची किंमत 3,750 रुपयांनी कमी करता येईल.

तसेच या एक्सचेंज ऑफरमध्ये फोनवर 42,500 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सवलत मिळेल. समजा तुम्हाला तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात तुम्हाला पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाली तर हा मोटोरोला फोन 49,999 – 42,500 रुपये म्हणजेच 7,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

जाणून घ्या खासियत

कंपनीच्या या शानदार फोनमध्ये तुम्हाला 6.9 इंचाचा LTPO OLED डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले फुल एचडी रिझोल्युशनसह येत असून त्याचा रिफ्रेश दर 144Hz आहे. यात 1.5 इंच कव्हर डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 चिपसेट मिळेल, स्टोरेजचा विचार केला तर यात 12 GB रॅम आणि 512 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्याय असेल. तसेच फोटोग्राफीसाठी कंपनी फोनमध्ये 64-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा देखील देत आहे.

शिवाय कंपनीने फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर दिला असून सेल्फीसाठी यामध्ये 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. या फोनची बॅटरी 4200mAh असून जी 30 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात वायरलेस चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

हा फोन Android 13 OS वर काम करेल आणि कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल सिम कार्ड, 5जी, ब्लूटूथ, जीपीएस, वाय-फाय 6ई, आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे पर्याय दिले आहेत. डॉल्बी अॅटमॉस साउंडने सुसज्ज असणारा हा फोन तुम्हाला सेज ग्रीन, समर लिलाक आणि व्हॅनिला या रंगपर्यायात खरेदी करता येईल.