file photo

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुका पाेलिसांनी सराईत माेटारसायकल चाेरास जेरबंद केले अाहे. त्याच्याकडून बारा मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या.

दत्तू सावळेराव पवार, रा. रांजणगाव ता. राहाता असे आरोपीचे नाव आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, निरीक्षक मधुकर साळवे,

उपनिरीक्षक अतुल बोरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, फौजदार अतुल बोरसे, सहायक फौजदार अशोक आढागळे,

सतीश गोरे, पोहेकॉ बाबु शेख,अली अब्दुला हबीब, अनिल शेंगाळे, आबासाहेब गोरे, दादासाहेब लोंढे, दादासाहेब गुंड, पठाण साजीद, पठाण चँदभाई, प्रशांत रणनवरे यांनी कारवाई केली.