अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-केडगावातील दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी सुवर्णा कोतकर यांना अटक करावी तसेच विशेष सरकारी वकिल म्हणून उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करावी अशी मागणी नगर शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्याकडे केली आहे.
दरम्यान 2018 साली महापालिकेच्या पोटनिवडणुकीत केडगावात दोघा शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.
संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांच्या हत्या प्रकरणात माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर, औंदुबर कोतकर हे आरोपी आहेत.
मात्र अद्यापही त्यांना अटक झालेली नाही. दोन वर्षे उलटून गेले तरी अजूनही आरोपींना अटक करण्यात आली नाही आहे.
सुवर्णा कोतकर यांनी कोर्टातून मिळविलेला जामीन फिर्यादीने रद्द करून आणला. तरीही पोलीस त्यांना अटक करत नाही,
अशी तक्रार खा. राऊत यांच्याकडे करण्यात आली. त्यावर राऊत यांनी पक्षीय पातळीवरून संबंधित यंत्रणेला आदेश दिले जातील.
सहा महिन्यात कोणतीच कार्यवाही झाली नाहीतर स्वत: नगरमध्ये येवून तळ ठोकून बसू असे आश्वासन दिले.