खासदार संभाजीराजे म्हणतात, फडणवीस बोलल्यानंतर बघू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- देवेंद्र फडणवीस बोलल्यानंतर बघू, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केली. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबाबत मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असेही त्यांनी शुक्रवारी सांगितले.

मराठा आरक्षणासाठी समाजातील समन्वयकांची मते, सूचना जाणून घेऊन खासदार संभाजीराजे यांनी १६ जूनपासून कोल्हापुरातून मूक आंदोलन करण्याची घोषणा गुरुवारी केली.

मोर्चा काढायचे रद्द करून राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या संकटातून वाचवण्यासाठी आपण मदत करणार आहात का,

असा थेट सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात खासदार संभाजीराजे यांना विचारला.

देवेंद्र फडणवीस ज्यावेळी माझ्याबद्दल काही बोलतील, त्यावेळी माझे उत्तर असेल. बाकी अन्य कोणालाही उत्तर देण्यास मी रास्त समजत नाही.

अहमदनगर लाईव्ह 24