खासदार सुजय विखे म्हणाले…राज्यात दिवाळीनंतर भाजपचे सरकार येईल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- राज्यात दिवाळीनंतर आपल्या विचारांचे सरकार सत्तेवर येणार असून त्यावेळी नागरिकांचे कोणतेच प्रलंबित प्रश्न शिल्लक राहणार नाही.

त्यामुळे थोड्या दिवस फक्त थांबा, यावरुन महाराष्ट्रात सत्तांतर होणार असल्याचा सूूचक इशारा खा. डॉ. सुजय विखे यांनी दिला. कर्जत तालुका दौऱ्यावर असताना त्यांनी हा दावा केला आहे.

दरम्यान पंचायत समिती मध्ये आढावा दरम्यान खा. डॉ. विखे बोलत होते. यावेळी उपस्थितीत नागरिकांनी प्रश्न आणि समस्या सुटत नसल्याची तक्रारी खा. डॉ. विखे पाटील यांच्याकडे केली.

त्या तक्रारीला उत्तर देताना विखेंनी हे प्रतिपादन केले. यावेळी प्रांताधिकारी अजित थोरबोल, गटविकास अधिकारी नानासाहेब आगळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश कुराडे,

वन विभागाचे अधिकारी केदार मुख्याधिकारी गोविंद जाधव, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, दादासाहेब सोनमाळी, प्रकाश शिंदे, काकासाहेब धांडे, अनिल दळवी, काकासाहेब ढेरे,

आशा वाघ, मंदा होले, राजश्री थोरात, सुनील यादव, डॉ. राऊत युवराज, बापूराव गायकवाड, सुनील काळे, नवनाथ तनपुरे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना विखे म्हणाले, केंद्र सरकारने देशातील शेतकर्‍यांना पीएम किसान योजनेअंतर्गत 72 हजार कोटी रुपये वाटले आहेत. मात्र दुसरीकडे राज्य सरकारने दोन लाख रुपयांची कर्जमाफी व नियमित पैसे भरणार्‍यांना 50 हजार रुपये विशेष सवलत जाहीर केली.

परंतु ती केवळ कागदावरच राहिली असून राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेचा बोजवारा उडाला, असल्याची टीका त्यांनी विखे यांनी केली.

अहमदनगर लाईव्ह 24