खासदार विखे म्हणाले…मंत्री असतो तर शेतकर्‍यांसाठी राजीनामा दिला असता

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- राहुरी येथे कार्यकर्त्यांच्यावतीने जिल्हा बँकेचे नूतन संचालक माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खा. डॉ. विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे होते.

यावेळी खासदार सुजय विखे यांनी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या वर टीकेचा भडीमार केला. तालुक्यातील मंत्री असताना शेतकर्‍यांना विजेच्या प्रश्नाला सामोरे जावे लागते हे दुर्दैव आहे. खुर्चीला चिकटून बसण्यापेक्षा राजीनामाद्यावा, आम्ही मंत्री असतो तर शेतकर्‍यांसाठी राजीनामा दिला असता अशी टीका खा. डॉ. सुजय विखे यांनी केली.

खा. डॉ. विखे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांबाबत अन्यायाचे धोरण घेतले आहे. उर्जामंत्र्यांच्या तालुक्यातच शेतकर्‍यांच्या विजेच्या बाबतीत गंभीर तक्रारी आहेत. यापुढे जिल्ह्यातील व प्रत्येक तालुक्यातील निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढू, असे सांगितले.

माजी आ. शिवाजीराव कर्डिले म्हणाले, राहुरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक लढविणार आहे. बंद पडलेला डॉ. तनपुरे कारखाना सुरळीत करण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून नेहमीच मदत केली.

यापुढेही सहकार्य राहील, असेही कर्डिले यांनी सांगितले. डॉ.खा. सुजय विखे म्हणाले, आपल्या मंडळाचा पदाधिकारी असो किंवा नातेवाईक कार्यकर्ता असो, ज्यांना वाड्यावर जायचे असेल त्यांनी खुशाल जा.

परत मात्र, त्यांना आमच्याकडे प्रवेश दिला जाणार नाही, असा सणसणीत इशारा खा. विखे यांनी पदाधिकार्‍यांसह कार्यकत्यार्ंना दिला आहे. वेळ आली तर मी आणि कर्डिले कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24