अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- पुढील २ वर्षात माझ्या मतदार संघात ५ हजार कोटींची कामे पूर्ण होतील. महा विकास आघाडी सरकार मधील मंत्री आणि त्यांचे आमदार भाजप काळात मंजूर कामांची अनेक लोकप्रतिनिधी उद्घाटन करीत आहेत.
या बाह्यवळण रस्ता हा एक हजार कोटी रुपयांचा असून ४०किमी लांबीचा आहे. त्यात ७ उड्डाण पूल असणार आहेत. उत्तर महाराष्ट्र मधील महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांच्या विकासकामांच्या निधीपेक्षा माझ्या मतदारसंघातील विकासकामांचा निधी निश्चित जास्त आहे. आजवर कोणत्याही कामांत आम्ही टक्केवारी घेत नाहीत.
महाविकास आघाडीच्या सरकार तर टक्केवारी आणि बदल्या कामात व्यस्त आहे. असा हाललाबोल खासदार डॉ.सुजय विखे यांनी केला. खासदार विखे पुढे म्हणाले की, आम्ही जाहिरातबाजी करत नाहीत. माझी काम करण्याची पध्दत माजी आमदार कर्डीले आणि आमदार पाचपुते यांच्या सारखी नाही.
पुढील २ वर्षात माझ्या मतदार संघात ५ हजार कोटींची कामे पूर्ण होतील. महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री आणि त्यांचे आमदार भाजप काळात मंजूर कामांची अनेक लोकप्रतिनिधी उद्घाटन करीत आहेत. या बाह्यवळण रस्ता हा एक हजार कोटी रुपयांचा असून ४० किमी लांबीचा आहे.
त्यात ७ उड्डाण पूल असणार आहेत. उत्तर महाराष्ट्र मधील महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांच्या या विकासकामांच्या निधीपेक्षा माझ्या मतदार संघातील विकासकामांचा निधी निश्चित जास्त आहे. आजवर कोणत्याही कामांत आम्ही टक्केवारी घेत नाहीत. महाविकास आघाडीच्या सरकार तर टक्केवारी आणि बदल्या कामात व्यस्त आहे.
डीपी चे उद्घाटन करणारा मंत्री मी पहिल्यांदा पाहत आहे.१० लाखांचे काम आणि तासभर भाषण असे सुरू आहे.भाजप काळात मंजूर कामांची उद्घाटने केली जात आहेत अशीही टीका नाव न घेता त्यांनी केली.
आमच्या जिल्हा परिषद अद्यक्ष पदकाळात आणि मी खासदार असताना टक्केवारी घेतली गेली हे कोणीही सांगावे. असे जाहीर आवाहनही त्यांनी केली. जिल्हा परिषद निवडणूक काळात आपण बॅटिंग करणार आहोत असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.