अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- ‘महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत २५ साखर कारखाने बंद पाडून खासगीकरण करून ताब्यात घेण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत.
मात्र, जोर्पंत मी जिवंत आहे, तोपर्यंत राहुरी कारखान्याच्या बाबतीत असे होऊ देणार नाही.’असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.
डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या अधिमंडळाची 65 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने पार पडली. याप्रसंगी खासदार डॉ. सुजय विखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विखे बोलत होते. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्रात मागील 3 वर्षात 25 सहकारी साखर कारखाने बंद पाडून खासगीकरण करून ताब्यात घेतले.
तनपुरे कारखान्याचे एप्रिल अखेरपर्यंत ऊस गाळप सुरू राहणार ज्यांचे राहूरी कारखान्याला उसाच टिपरु जात नाही, त्यांना आमच्यावर टीका करायचा अधिकार नाही.
नर्सिंग होम, इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये मी कधी पाय ठेवला नाही, माझं एकच ध्येय सभासद, कामगारांचा आत्मा असलेला राहूरी कारखाना सुरळीत चालवून सर्वांना न्याय मिळावा, हीच आमची पहिल्यापासूनच भूमिका आहे.