राज्यात 11 एप्रिल रोजी होणारी MPSC परीक्षा पुढे ढकलली !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) 11 एप्रिला होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करीत आहेत.राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण होते.

अभ्यासाला असणाऱ्या काही विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली असून परीक्षा झाल्यास कोरोनाचा उद्रेक वाढेल ; तरी परीक्षा पुढे ढकलावी अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून येत होती. राज्यात कोरोना विषाणूने कहर केला असून जनतेची चिंता वाढली आहे.

याच पार्श्वभूमीवर11 तारखेला होणारी एमपीएससीपूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि अधिकारी यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत ही बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी म्हणजेच 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा होणार होती. परंतु, या परीक्षेवर अनिश्चिततेचं सावट होतं. मात्र, परीक्षेबाबत सरकारकडून एमपीएससी प्रशासनाला कोणतीही सूचना मिळालेली नव्हती.

त्यातच राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लावले असून शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस पूर्णपणे लॉकडाऊन आहे. त्यामुळे परीक्षा 11 एप्रिलला होणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, आता ही परीक्षा होणार नसल्याचे निश्चित झाले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यापूर्वीच ठाकरे सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता परंतु त्यावेळी विद्यार्थ्यांनी सरकार विरोधात आक्रोश करत परीक्षा घेण्याची मागणी केली होती.त्यामुळं नाईलाजाने सरकारला परीक्षेचा निर्णय घ्यावा लागला होता. अखेर आता विद्यार्थ्यांनीच परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केल्याने राज्य सरकारने परीक्षा पुढे ढकलन्याचा निर्णय घेतला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24