अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. येत्या महिला दिनी त्यांचे नवे गाणे प्रदर्शित होणार आहे.
अमृत फडणवीस यांनी एका ट्विटच्या माध्यमातून या आगामी गाण्याची घोषणा केली. या नव्या गाण्याचं नाव त्यांनी अद्याप सांगितलेलं नाही. परंतु त्या गाण्यातील एक कडवं मात्र त्यांनी पोस्ट केलं आहे.
जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिला – कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी….. तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतीचा प्रवाह रोखणे शक्य नाही !’स्त्री शक्ती’ला गौरवान्वित करणारे माझे नवीन गीत 8 मार्च रोजी,
जागतिक महिला दिनी !” अशी माहिती अमृता फडणवीसांनी दिली आहे. या गाण्यातून माध्यमातून त्या महिलांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
या पूर्वी अमृता फडणवीस यांनी ‘डाव’ या मराठी चित्रपटातील ‘अंधार’ हे गाणं गायलं होतं आठ मार्चला आपलं नवीन गाणं रिलीज होणार असल्याची माहिती अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.
ट्रोलर्सना तयार राहण्याचाही इशाराही त्यांनी दिला होता. माझं आणखी एक गाणं येतंय, मी ट्रोलर्सना या गाण्यातून उत्तर देईन, असं मिसेस फडणवीस म्हणाल्या होत्या. महिला दिनानिमित्त काही देशांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात येते.
तर काही देशांमध्ये ऑफिसेसमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या जागतिक दिनाचं निमित्त साधून अमृता फडणवीस नवं गाणं घेऊन येत आहेत.