अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- राज्यात सर्वत्र महावितरणने वीजबिल वसुली मोहीम आक्रमकपणे सुरु केली आहे. कोरोनाकाळातील कोणतेही वीजबिले माफ होणार नाही याबाबतची घोषणा झाल्यांनंतर आता महावितरणने धडक मोहीमच हाती घेतली आहे.
नुकतेच महावितरणच्या पुणतांबा उपकेंद्रांतर्गत कृषी पंपधारक, औद्योगिक, व्यापारी व घरगुती वीज ग्राहकांकडून अंदाजे 15 कोटी 57 लाख रुपयाची थकित वीज बिल वसुलीसाठी येथील अधिकारी व कर्मचारी वर्गाने धडक मोहीम सुरु केली आहे. अधिकार्यांना वसुलीसाठी डीपी बंद करण्याचे तसेच वीज कनेक्शन कट करण्याचे आदेश मिळाले आहे.
महावितरणच्या अधिकार्यांनी आवाहन करूनही कृषी पंपधारकांकडून अवघे 3 लाख व घरगुती ग्राहकाकडून 10 लाख असे आतापर्यंत एकूण फक्त 13 लाख रुपये वसुली झाल्याचे येथील अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नाईलाजास्तव वसुलीसाठी धडक कारवाई सुरू झाली आहे. कृषी पंपधारकांना वीज बिले माफ होण्याची शक्यता धुसर झाली आहे.
डीपी बंद झाली तर पाण्यावर आलेली रब्बी पिके वाया जाऊ नयेत यासाठी शेतकरी वर्गाची सुध्दा कृषी संजीवनी योजनेअंतर्गत असलेल्या योजनेचा लाभ घेऊन बिले भरण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. बिलच मिळाली नाही तर भरू काय ? महावितरणचे कर्मचारी डेरा नाला येथील बखळे वस्ती समोरची डी.पी तीन दिवसांपासून बंद असल्यामुळे
पाहणी करण्यासाठी आले होते. मात्र पाहणी करण्यापूर्वीच त्यांनी सर्वांनी बिले भरली तर डीपी सुरू करतो, असे स्पष्ट केले. मात्र आम्हाला बिलेच मिळाली नाही. त्यामुळे किती रक्कम भरावयाची हेच माहीत नाही.