अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- कोरोनाच्या संकट काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत असतानाही महिना अखेर पगार होत नसल्याने महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला आहे.
यामुळे सर्व कंत्राटी कामगार मंगळवारी निषेध करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे जिल्हाध्यत्र ए. एम. लांडगे यांनी पत्रकात दिली आहे.
दरम्यान महावितरणच्या पत्रकात म्हटले आहे की, महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीत सुमारे ३२ हजार वीज कंत्राटी कामगार नियमित रिक्त पदांच्या जागेवर मागील १५ ते २० वर्षे कार्यरत आहेत.
मागील वर्षभर कोरोनाकाळात या कामगारांनी वीजनिर्मिती, वीजवहन, वीज वितरण करत आपला जीव धोक्यात घालून विक्रमी महसूल गोळा करून दिला आहे.
राज्याला अखंडित व सुरळीत वीजपुरवठा सेवा देताना ४० कंत्राटी कामगारांचा अपघातात मृत्यू झाला. मात्र, त्यांच्याकडे शासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.
ऊर्जा खात्यातील कंत्राटी कामगारांनी या राज्याला महसूल मिळवून दिला, ,तर आता याच कर्मचाऱ्यांना पगारासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.