अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :- वीज बिल भरण्याच्या कारणातून शहराच्या गंजबाजार येथील महावितरण कार्यालयातील सहायक अभियंता स्वप्नील संजयराव उल्हे यांना 10 ते 15 लोकांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, महावितरण विभागाच्या गंजबाजार कार्यालयाअंतर्गत येणार्या जुना बाजार परिसरातील सुल्तान शेख याचे वीज बिल थकले होते. बुधवारी महावितरणचे अधिकारी बिल वसुली करण्यासाठी शेख याच्या घरी गेले होते. त्याने बिल भरले नाही. उलट सायंकाळी 10 ते 15 इसमांना घेऊन तो कार्यालयात आला.
यावेळी तेथे असलेले सहायक अभियंता उल्हे यांच्याशी हुज्जेत घातली. त्यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. या प्रकरणी अभियंता उल्हे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सुल्तान दुल्हेखान शेख (रा. जुनाबाजार, नगर)
याच्यासह 10 ते 15 अनोळखी व्यक्तीविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलिसांनी शेख याला बुधवारी रात्रीच अटक केली.
त्याला गुरूवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत उल्हे यांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ करीत आहेत.