महावितरणच्या अधिकाऱ्यांची आमदार काळेंकडून खरडपट्टी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- कोपरगाव | विजेच्या बाबत अनेक नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या असंख्य तक्रारी येत आहेत. आपल्या कामात सुधारणा न झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा निर्वाणीचा ईशारा देऊन काम करायचे नसेल तर बदली करून घ्या, असा शब्दात आमदार काळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.

कोपरगाव येथे गौतम बँकेच्या सभागृहात आमदार काळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विजेच्या विविध अडचणींसंदर्भात आढावा घेत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

कोपरगाव शहर व मतदारसंघात नागरिकांना विजेच्या बाबतीत अनंत अडचणी येत आहेत. कमी दाबाने होणारा वीजपुरवठा, वारंवार जाणारी वीज व अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे रखडली आहेत. नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी अनेक रोहित्र मंजूर केले आहेत.

मात्र रोहित्र उभारणीचे काम घेतलेले ठेकेदार वेळेत काम पूर्ण करीत नसल्यामुळे अडचणींमध्ये भर पडत आहे. अशा ठेकेदारांवर महावितरण कारवाई का करीत नाही? असा सवाल केला.

अहमदनगर लाईव्ह 24