दोन वर्षांत वीजचोरी करणाऱ्या पाच हजाराहून अधिकांवर महावितरणकडून कारवाई

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :-  जिल्ह्यातील महावितरणच्या संगमनेर विभागात संगमनेर, अकोले, कोपरगाव आणि राहाता या विभागात दोन वर्षांत वीजचोरी करणाऱ्या ५ हजार ४४३ जणांवर महावितरणकडून कारवाई करण्यात आल्याचे महावितरण कंपनीकडून सांगण्यात आले.

वीजचोरांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार… जुना कायदा जाऊन नवीन कायदा आला. वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास घरात कायमचा अंधार होऊ शकतो. तसेच दंडात्मक कारवाईसह फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊ शकतात. नवीन कायद्यात वीजचोरी दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा ठरविण्यात आला आहे.

नवीन कायद्यामुळे वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. गेल्या काही वर्षात वीजचोरीच्या माहितीनुसार भरारी पथकाने केलेल्या कारवाईत ४ कोटी १० लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस झाली होती. ही रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यात आली होती.

वीजचोरी उघड झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध दंडात्मक तसेच फौजदारी स्वरूपाची कारवाईदेखील करण्यात येते. ‘वीजचोरी कळवा बक्षीस मिळवा’ वीजचोरीला आळा बसावा यासाठी महावितरण कंपनीतर्फे वीजचोरीविरोधात सातत्याने मोठ्या प्रमाणात मोहिमा राबविण्यात येतात.

तरीदेखील काही वीजग्राहक नवनवीन युक्ती राबवून वीजचोरी करत असतात. महावितरणतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘वीजचोरी कळवा बक्षीस मिळवा’ या योजनेमध्ये वीजचोरीबाबत माहिती देणाऱ्यांना आतापर्यंत लाखो रुपये रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात आले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24