महावितरणच्या कारवाईचा ऊर्जामंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांना फटका,मतदार संघातील नागरिकांनीच…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-थकीत वीजबिलासाठी शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करणाऱ्या महावितरण कंपनीने आता पाणी योजनांकडे आपला मोर्चा वळवला आहे.

मात्र महावितरणच्या या कारवाईचा फटका ऊर्जामंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांना बसला असल्याचे चित्र समोर आले आहे. नगर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात गावांची तहान भागविणाऱ्या बुऱ्हानगर पाणी योजनेचे वीज जोड तोडण्यात आल्याने सदर योजना बंद झाली आहे.

ऊर्जामत्र्यांच्याच मतदार संघात हा प्रकार घडल्याने ऊर्जामंत्री ना.तनपुरे यांचा जेऊर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्याच्यावतीने निषेध करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, ऐन उन्हाळ्यात बुऱ्हानगर पाणी योजना बंद करण्यात आल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

महावितरण कंपनीने थकीत वीज बिलासाठी वीज जोडणी तोडल्याने योजना बंद झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने नामदार तनपुरे यांचा निषेध नोंदविण्यात आला आहे. महावितरण कंपनीने मंगळवारी मार्च रोजी थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी बुऱ्हानगर पाणी योजनेची वीज जोडणी तोडल्याने सदर योजना बंद झाली आहे.

सदर योजना थकित सुमारे चार कोटी रुपयांमुळे आर्थिक अडचणीत आली आहे. योजना सुरू करण्यासाठी पंचायत समितीने ५० लाख रुपयांचा धनादेश महावितरणकडे जमा केला परंतु थकबाकीची रक्कम मोठी असल्याने आणखी रक्कम भरल्याशिवाय वीज जोडणी देणार नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे.

तरी नागरीकांचे पाण्यावाचून हाल होत असून सदर योजनेची वीज जोडणी सुरळीत करून योजना सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24