संकटकाळात मुकेश अंबानींचा महाराष्ट्रास मदतीचा हात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :- राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून ऑक्सिजनचा भीषण तुटवडा निर्माण झाला आहे.

अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी राज्य सरकारच्या मदतीसाठी धावून आले आहेत.

रिलायन्सच्या गुजरातमधील जामनगर रिफायनरीमधून राज्य सरकारला १०० मेट्रिक टन प्राणवायू पुरवला जाणार आहे. मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे राज्य सरकारने इतर राज्यांमधून ऑक्सिजन मागवला आहे.

रिलायन्सकडून पेट्रोलियम कोक गॅसिफिकेशनसाठी ऑक्सिजनचा वापर केला जातो. त्यामुळे कंपनीकडे उपलब्ध साठ्यापैकी १०० मेट्रिक टन ऑक्सिजन वैद्यकीय वापरायोग्य करून तो महाराष्ट्राला विनाशुल्क पुरवला जाणार असल्याचे रिलायन्समधील एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

दरम्यान, राज्यात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी राज्य सरकारने समन्वय समितीची स्थापना केली आहे. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत नुकतीच नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली.

यात ऑक्सिजन उपलब्धता आणि पुरवठा, त्याची वाहतूक करण्यासाठीची आवश्यक साधने यावर चर्चा करण्यात आली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24