अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- घाटमाथ्यावर पाऊस कायम असल्याने शनिवारी १२ तासात मुळा धरणात ३२० दशलक्ष घनफूट पाण्याची वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोतुळकडून मुळा धरणात समाधानकारक पाण्याची आवक सुरू आहे.

ही आवक टिकून राहिल्यास सप्टेंबर अखेरपर्यंत मुळा धरण तांत्रिकदृष्ट्या भरण्याचा योग जुळून येणार आहे. शनिवारी सकाळी कोतुळकडून मुळा धरणात ७ हजार ३४२ क्युसेकने तर सायंकाळी ६ वाजता ४ हजार ४२९ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.

सायंकाळपर्यंत धरणाचा पाणीसाठा २१ हजार ८०९ दशलक्ष घनफूट झाल्याने २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेचे धरण ८३.८८ टक्के भरले. ऑगस्टमध्ये समाधानकारक पाण्याची आवक सुरू राहिल्याने धरणाचा पाणीसाठा वाढला होता.

पुर्वा नक्षञाच्या शेवटच्या टप्प्यात धरणात समाधानक पाण्याची आवक सुरू आहे. दि. १३ सप्टेंबरपासून उत्तरा नक्षञाला सुरवात होणार आहे.

धरण तांञिकदृष्ट्या भरण्यासाठी उत्तरा नक्षत्रातही पावसाची गरज आहे. गेल्या चार दिवसापासुन तालुक्यात पावसाने उघडीप दिली.

शनिवारी सायंकाळी ६ वाजता धरणाचा पाणीसाठा २१ हजार ८०९ दशलक्ष घनफूट झाल्याने धरण ८३.८८ टक्के भरले आहे. मागील वर्षी आज मुळा धरणात २५ हजार ४४४ दशलक्ष घनफूट पाणी होते.