Mula dam capacity : मुळा धरण ‘इतके’ भरले

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- घाटमाथ्यावर पाऊस थंडावल्याने कोतुळकडून मुळा धरणात येणारी आवक घटली आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १,३९३ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.

सायंकाळी ६ वाजता मुळा धरणाचा पाणीसाठा २५ हजार २१६ दशलक्ष घनफूट झाल्याने धरण ९७ टक्के भरले आहे.

मागील वर्षी आजच्या दिवशी मुळा धरणाचा पाणीसाठा २५ हजार ४४४ दशलक्ष घनफूट इतका, तर कोतुळकडून मुळा धरणात ५०२ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेचे मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय नदीपात्रात पाणी सोडणार नसल्याची भूमिका मुळा पाटबंधारे प्रशासनाकडून घेण्यात आलेली आहे.

दरम्यान, मुळा धरण लवकर भरून त्यातून लवकर सुटावे, याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

Ahmednagarlive24 Office