Multibagger Share : शेअर बाजारात असे शेअर्स आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना करोडो रुपयांची कमाई करून देतात. टाटाच्या एका शेअरने गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. जर तुमच्याकडेही हा शेअर असता तर त्याचा तुम्हालादेखील खूप फायदा झाला असता.
टाटाचा हा शेअर 3 रुपयांवरून 3300 रुपयांवर गेला आहे, त्यात तब्बल 100000% ची तुफानी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. झुनझुनवाला कुटुंबाकडे या कंपनीचे 4 कोटींहून अधिक शेअर्स आहेत. त्यांना याचा खूप फायदा झाला आहे.
झुनझुनवाला कुटुंबाकडे आहे इतके शेअर्स
महत्त्वाचे म्हणजे जून 2023 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे एकूण 4,75,95,970 शेअर्स शिवाय कंपनीमध्ये 5.36% हिस्सा आहे. मार्च 2023 च्या तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनमध्ये 5.29% इतका हिस्सा होता.
तर झुनझुनवाला यांनी जून तिमाहीत टायटनचे 6 लाखांपेक्षा जास्त शेअर्स खरेदी केले आहेत. हे लक्षात घ्या की टायटन हा अनुभवी गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचा आवडता स्टॉक आहे. रेखा राकेश झुनझुनवाला यांची पत्नी असून राकेश झुनझुनवाला यांचे 14 ऑगस्ट 2022 रोजी निधन झाले.
एका दिवसात 460 कोटीची कमाई
वास्तविक रेखा झुनझुनवाला यांना टायटनच्या शेअर्सच्या वाढीचा मोठा फायदा झाला असून टायटनचा शेअर शुक्रवारी बीएसईवर 3250.45 रुपयांवर बंद झाला आहे. या कंपनीचे सोमवारी बीएसईमध्ये शेअर्स 3347.45 रुपयांवर पोहोचले आहेत.
म्हणजेच टायटनच्या शेअर्समध्ये एका दिवसात तब्बल 97 रुपयांची वाढ झाली आहे. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे एकूण 4,75,95,970 शेअर्स असून टायटनच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे त्यांच्या संपत्तीत एका दिवसात तब्बल 460 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.
1 लाखातून 10 कोटींपेक्षा जास्त कमाई
टायटन कंपनीचे शेअर्स 1 ऑगस्ट 2003 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 3.15 रुपये होते. तर 18 सप्टेंबर 2023 रोजी कंपनीचे शेअर्स बीएसईमध्ये 3347.45 रुपयांवर पोहोचले असून टायटनच्या शेअर्सनी या कालावधीत 105000 टक्क्यांचा शानदार परतावा दिला आहे. समजा एखाद्या व्यक्तीने 1 ऑगस्ट 2003 रोजी टायटनच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असल्यास आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असल्यास तर या कंपनीच्या शेअर्सचे सध्याचे मूल्य 10.62 कोटी रुपये झाले असते.