Multibagger Stock : गुंतवणूकदारांना ‘या’ कंपनीने दिला 962% परतावा, तुमच्याकडेही आहे का हा शेअर?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Multibagger Stock : अनेकजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून लाखो रुपयांची कमाई करत आहेत. असे काही शेअर आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना सर्वात जास्त परतावा देतात. तर काही शेअरमुळे गुंतवणूकदारांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला मार्केटबद्दल संपूर्ण माहिती असावी. तरच तुम्हाला त्यातून पैसे कमावता येतील. नाहीतर तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल. मागील 3 वर्षांमध्ये, KPIT Technologies Ltd च्या शेअरच्या किमतीत खूप वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

समजा कोणत्याही गुंतवणूकदाराने KPIT Technologies च्या शेअर्सवर 1 लाख रुपयांची गुंतवणूक करून ती आत्तापर्यंत ठेवली होती, तर त्या गुंतवणूकदाराचा परतावा 10.57 लाख रुपयांपर्यंत वाढला असता.

किमतीचा विचार केला तर 12 ऑक्टोबर 2023 रोजी KPIT Technologies Ltd च्या एका शेअरची किंमत 113.45 रुपये इतकी होती. जो शुक्रवारी 1201 रुपयांच्या पातळीवर गेला होता. मागील 3 वर्षांत कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 962 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

KPIT Technologies चा सर्वकालीन उच्चांक रु 1237.80 प्रति शेअर इतका आहे. महत्त्वाचे म्हणजे 12 ऑक्टोबर 2023 रोजी कंपनीचे शेअर्स या पातळीवर व्यवहार करत होते. तसेच 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 615.40 रुपये प्रति शेअर इतका आहे.

मागील एका वर्षात KPIT Technologies च्या शेअर्सच्या किमतीत 80.19 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. तर त्याच वेळी, या शेअरच्या किमतीत 2023 मध्ये आतापर्यंत 72.43 टक्क्यांची वाढ झाली आहे.

तिमाहीत मिळाला निव्वळ नफा

आनंदाची बाब म्हणजे वार्षिक आधारावर 53.7 टक्के वाढीनंतर जून तिमाहीत KPIT Technologies Ltd चा निव्वळ नफा रु. 134.43 कोटी इतका होता. परंतु, गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा एकूण नफा 85.40 कोटी रुपये इतका होता. कंपनीसाठी चांगली गोष्ट म्हणजे मार्चच्या तुलनेत निव्वळ नफ्यात 20.48 टक्क्यांची वाढ झाली आहे.