ताज्या बातम्या

Multibagger Stock : 3 वर्षात ‘या’ शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना केले श्रीमंत; नाव जाणून घ्या…

Published by
Renuka Pawar

Multibagger Stock : शेअर मार्केटमध्ये सध्या गुंतवणूकदारांची संख्या वाढत आहे. गुंतवणूकदार संध्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. कारण येथील परतावा हा इतर गुंतवणुकीपेक्षा खूप जास्त आहे. अशातच तुम्हीही येथे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर काही शेअर्स आहेत ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे आणि त्यांच्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. यापैकी काही शेअर्समध्ये KPIT Technologies Limited च्या शेअरचे नाव देखील आहे.

KPIT Technologies Limited च्या शेअर्सनी त्यांच्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सने गेल्या 3 वर्षांत गुंतवणूकदारांच्या पैशात जवळपास 900 टक्क्यांनी वाढ केली आहे.

आयटी क्षेत्रातील हा शेअर १२ ऑक्टोबर २०२० रोजी ११३.४५ रुपयांवर बंद झाला. हा शेअर शुक्रवारी बीएसईवर 1201.10 रुपयाच्या पातळीवर बंद झाला, म्हणजेच या कालावधीत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 962 टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने सुमारे 3 वर्षांपूर्वी या कंपनीच्या स्टॉकमध्ये 2 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याची 2 लाख रुपयांची रक्कम 21 लाख 14 हजार रुपये झाली असती.

6 महिन्यांत 40 टक्के परतावा

KPIT Technologies च्या शेअर्सनी गेल्या 6 महिन्यांत ग्राहकांना 40 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्याचप्रमाणे, जर आपण YTD आधारावर पाहिले तर या शेअर्सने 72 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या शेअरने कमी कालावधीतही चांगला परतावा दिला आहे. गेल्या 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने ग्राहकांना सुमारे 2.59 टक्के परतावा दिला आहे. गेल्या 5 ट्रेडिंग दिवसांबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या 5 मध्ये कंपनीच्या शेअर्सने ग्राहकांना 6 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

जर आपण या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्च आणि निम्न पातळी पाहिली, तर तिच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्च पातळी 1237.80 रुपये आहे. त्याचप्रमाणे, जर आपण या कंपनीच्या शेअरच्या 52 आठवड्यांच्या निम्न पातळीबद्दल बोललो तर त्याची 52 आठवड्यांची निम्न पातळी 615.40 रुपये आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar