Multibagger Stock : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती असावी लागते. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी शेअर मार्केटमध्ये उत्तम परतावा मिळतो असे नाही.
परंतु बाजारात असे काही शेअर्स आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देतात. मागील काही वर्षांत IFL एंटरप्रायझेसने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. IFL एंटरप्रायझेसचा BSE SME IPO मार्च 2020 मध्ये लॉन्च केला होता. जर तुम्ही यात गुंतवणूक केली असती तर तुम्हाला त्याचा फायदा झाला असता.
जाणून घ्या बोनस शेअरचा इतिहास
बीएसईच्या अधिकृत वेबसाइटनुसार, 21 सप्टेंबर 2022 रोजी IFL एंटरप्रायझेसचे शेअर्स हे 1:1 च्या एक्स-बोनस गुणोत्तराने व्यवहार झाले होते. एकंदरीतच या कंपनीने 1 शेअरच्या बदल्यात आपल्या गुंतवणूकदारांना 1 बोनस शेअर दिला आहे. तर दुसरीकडे, 21 एप्रिल 2023 रोजी कंपनीच्या शेअर्सचा एक्स-बोनस रेशो 1:4 वर व्यवहार झाला आहे. एकंदरीतच या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 4 समभागांऐवजी 1 शेअर भेट म्हणून दिला होता.
स्टॉक स्प्लिट: तर दुसरीकडे SME या स्टॉकचा 1:10 च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिटसाठी 21 एप्रिल 2023 रोजी एक्स-स्प्लिटवर व्यवहार झाला आहे. एकंदरीतच १० रुपये दर्शनी मूल्याचा स्टॉक प्रत्येकी १ रुपयाच्या इक्विटी शेअरच्या १० तुकड्यांमध्ये विभागण्यात गेला आहे.
1,50,000 शेअर्स
या स्मॉल-कॅप कंपनीच्या IPO ची लॉट साइज ही 6000 इतकी होती. एकंदरीतच, 1:1 मध्ये बोनस शेअर्स जारी केल्यानंतर, गुंतवणूकदाराचे शेअरहोल्डिंग 12,000 रुपये (6,000 x 2) पर्यंत वाढू शकतात. त्यानंतर, 1:4 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी केले तर शेअरहोल्डिंग रु. 15,000 [12,000 x {(1 4) / 4}] पर्यंत वाढले असते. इतकेच नाही तर 1:10 च्या प्रमाणात स्टॉक विभाजित झाल्यानंतर, हे 15,000 शेअर्स 1,50,000 शेअर्सपर्यंत वाढले असते.
आज झाली असती बक्कळ कमाई
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज आयएफएल एंटरप्रायझेसच्या शेअरची किंमत १४.४२ रुपये इतकी आहे. यानुसार आपण पाहिले जर आजपर्यंत एखाद्या गुंतवणूकदाराने या SME स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असती, तर आज त्याची 1.20 लाख रुपयांचे मूल्य 21.63 कोटी रुपये (14.42 x 1,50,000) इतके झाले असते.