Multibagger Stocks : बऱ्याच जणांना झटक्यात खूप पैसे कमवायचे असतात. त्यासाठी ते वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. त्यापैकी शेअर बाजारातील गुंतवणूक सर्वात धोकादायक असली तरी त्यात अनेकजण गुंतवणूक करतात. हेच गुंतवणूकदार श्रीमंतांच्या यादीत कधी सामील होतील, हे काही सांगता येत नाही.
जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असाल तर त्यापूर्वी सर्व माहिती जाणून घ्या. कारण प्रत्येक वेळेस यामध्ये तुम्हाला उत्तम परतावा मिळतोच असे नाही. तर अनेकदा यात गुंतवणूकदारांना शानदार परतावा मिळतो. त्यामुळ गुंतवणूक करण्यापूर्वी एकदा त्या कंपनीबद्दल माहिती जाणून घ्या. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसेल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाजारात अशा अनेक कंपन्यांचे शेअर बाजारात आहेत, त्यामुळे गुंतवणूकदारांचे रातोरात नशीब बदलले आहे. असाच एक शेअर म्हणजे प्राइम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा, ज्याने अवघ्या 9 महिन्यांत मल्टीबॅगर परतावा देत गुंतवणूकदारांना लखपती केले आहे. जर तुमच्याकडे हा शेअर असता तर त्याचा तुम्हाला देखील खूप फायदा झाला असता.
अवघ्या 6 महिन्यांत दिला 1500% परतावा
प्राइम इंडस्ट्रीज लिमिटेड अर्थात पीआयएलच्या शेअर इतिहासानुसार, मागील सहा महिन्यांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना एकूण 1,584.70% परतावा दिला आहे. म्हणजेच या काळात हा शेअर 8 रुपयांवरून सध्याच्या किमतीपर्यंत वाढला असून मागील एका वर्षात हा शेअर तब्बल 1,584.70% वाढला आहे.
तर त्याच वेळी, मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 24,300% परतावा दिला आहे. किमतीचा विचार केला तर या काळात या शेअरची किंमत 60 पैशांवरून 146 रुपये इतकी झाली आहे.
कंपनीचा व्यवसाय
कंपनीच्या व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर प्राइम इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी ‘वनस्पती’च्या उत्पादनासोबतच विपणन व्यवसायात सक्रिय असून कंपनीने बेकरी-गुणवत्तेच्या वनस्पतीचे उत्पादन सुरू केले आहे ज्याची बाजारात चांगली पकड आहे. उत्तम दर्जाचे शुद्ध तेल तयार करण्याच्या उद्देशाने सूर्यफूल तेल इत्यादींसारख्या वेगवेगळ्या तेलांवर प्रक्रिया करण्यात येते.