ताज्या बातम्या

मुंबई महानगरपालिकेत सरकारी नोकरीची संधी ! या’ पदासाठी निघाली मोठी भरती टायपिंग येणाऱ्याची होणार निवड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Mumbai Jobs : राजधानी मुंबईत सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी नुकतीच अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून ही जाहिरात काढण्यात आली आहे.

सदर जाहिरातीनुसार महानगरपालिकेत विविध रिक्त पदांच्या 226 जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणारभरल्या जाणार आहेत. दरम्यान आज आपण मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या या पदभरतीची सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदासाठी होणार भरती ?

बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी आणि मराठी) या पदासाठी ही भरती आयोजित होणार आहे.

किती पदांसाठी होणार भरती

जाहिरातीनुसार मुंबई महापालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लघुलेखक या पदाच्या एकूण 226 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक अहर्ता

सदर पदासाठी कोणत्याही शाखेतून पदवीधर असलेला आणि मराठी तसेच इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असलेला उमेदवार पात्र राहणार आहे. मात्र पदासाठीच्या आवश्यक शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी एकदा अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे उमेदवारांसाठी आवश्यक राहणार आहे.

किती पगार मिळणार

पे मॅट्रिक्स 15 नुसार सदर पदासाठी नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 25 हजार 500 ते 81,100 दरम्यान वेतन दिले जाणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार?

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना https://portal.mcgm.gov.in/  या महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज करण्यापूर्वी मात्र सदर संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या हाऊ टू अप्लाय या पर्यायातील सर्व अटी आणि शर्तीचे पालन सदर इच्छुक उमेदवाराने करणे अपेक्षित आहे. उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट काढून सदर अर्ज स्वतःजवळ ठेवणे अपेक्षित आहे.

अर्ज केव्हा सुरू होणार

या पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून 15 ऑगस्ट 2023 ते 4 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्थातच या पदभरतीसाठी उद्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून 4 सप्टेंबर पर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू राहणार आहे. यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित कालावधीमध्ये आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करणे अपेक्षित आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24