Mumbai Railway News : ठाणेकरांना लवकरच एक मोठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. खरं पाहता ठाणे रेल्वे स्थानक हे मुंबई नंतर सर्वाधिक मोठे रेल्वे स्थानक म्हणून ओळखल जात. हे रेल्वे स्थानक मध्य रेल्वेसाठी सर्वाधिक महसूल गोळा करून देण्यात मोठा सिंहाचा वाटा उचलत.
अशा परिस्थितीत या रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना अधिका-अधिक सुविधा मिळवून देण्यासाठी मध्य रेल्वे कायमच प्रयत्न करत असते. दरम्यान आता ठाण्यातील रेल्वे प्रवाशांना लवकरच एक मोठी भेट मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
खरं पाहता हार्बर आणि ट्रान्स हार्बर या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी या मार्गांवर एसी लोकल पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवाशांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. दरम्यान ठाण्यातील शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी देखील प्रवाशांची ही मागणी लक्षात घेता मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांच्याकडे या संदर्भात मागणी केली आहे.
पनवेल ते सीएसटीएम हार्बर मार्गावर आणि वाशी ते ठाणे आणि पनवेल ते ठाणे या ट्रान्सहार्बर मार्गावर एसी लोकल पुन्हा सुरू करण्याची मागणी खासदार महोदय यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! महाराष्ट्रासाठी पुढील चार ते पाच दिवस येलो अलर्ट; ‘या’ भागात होणार गारपीट, IMD चा अलर्ट
यामुळे आता या मार्गावर पुन्हा एकदा एसी लोकल सुरू होतात का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. खासदार विचारे यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकासोबत एका बैठकीदरम्यान ही मागणी केली आहे.
यासोबतच खासदार महोदय यांनी दिघा रेल्वे स्थानक देखील लवकरात लवकर प्रवाशांच्या सेवेत दाखल झालं पाहिजे अशी मागणी केली आहे. यामुळे खासदार महोदयांनी केलेल्या या सर्व मागणीवर आता मध्य रेल्वेच्या माध्यमातून काय ॲक्शन घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
हे पण वाचा :- पदवीधर तरुणांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ सरकारी बँकेत मोठी भरती, ‘ही’ पदे भरली जाणार; वाचा सविस्तर