file photo

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :-  कोरोनाच्या सावटामुळे मागील वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानेही नाकारण्यात आले होते. परंतु, नगर शहरात गेल्या काही महिन्यांपासून कोरोना नियंत्रणात आहे.

त्यामुळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांना परवानगी देण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. विशेष म्हणजे या परवन्यासाठी एक खिडकी योजना सुरू केली आहे.

महापाैर रोहिणी शेंडगे यांनी या परवान्याबाबत माहिती जारी केली आहे. सार्वजनिक मंडळांना गणेश मूर्तीला ४ तर घरगुती मूर्तीला २ फुटापर्यत मर्यादा आहे. अर्ज आल्यानंतर परवानगी द्यावी, अशा सूचना महापाैर शेंडगे यांनी दिल्या आहेत.

गणेश मंडळांनी धर्मदाय आयुक्तांकडील नोंदणी प्रमाणपत्र, पोलिस स्टेशन, शहर वाहतूक शाखा यांचे ना हरकत दाखले घेऊन मनपात अर्ज दाखल करावा. याठिकाणी अग्निशमन विभाग, नगररचना, बांधकाम विभागाकडील ना हरकत दाखला एकाच ठिकाणी देण्यात येईल.