अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- कोविड सेंटरमधून कर्तव्य बजावल्यानंतर घरी परतणार्या कोपरगाव पालिकेच्या कर्मचार्याला पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान गाडी अडवून मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.3) सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली आहे.
या घटनेचा तीव्र निषेध करुन संबंधितांवर कारवाई करण्याबाबतचे निवेदन अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेने मंगळवारी तहसीलदारांना दिले आहे.
तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकार्यांनी एका दुचाकीवर एकासच प्रवास करण्याचे आदेश निर्गमित केलेले आहे. परंतु, काही पालिका कर्मचार्यांकडे वाहने नसल्याने त्यांना सहकार्यासोबत एकाच दुचाकीवर जाण्याची वेळ येते.
दरम्यान, कोपरगाव शहरातील साई कॉर्नर येथे पालिका व पोलीस पथक संयुक्तरित्या नाकाबंदी करुन कारवाई करत होते. त्याचवेळी एसएसजीएम महाविद्यालयातील कोविड सेंटरमधून पालिकेचे सफाई कर्मचारी देवेंद्र डाके व पंकज गोयर हे कर्तव्य निभावून घरी परतत होते.
त्यांच्या अंगावर गणवेश व ओळखपत्र असतानाही पोलिसांनी कोणताही मुलाहिजा न ठेवता दुचाकी अडवून चावी काढून घेत मारहाण करुन गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली.
कोविडच्या संकटात आरोग्य, पोलीस, महसूल यांच्याबरोबर पालिकेचे कर्मचारी देखील जीव धोक्यात घालून राष्ट्रीय कर्तव्य निभावत आहे. मात्र, पोलिसांनी याचा कोणताही विचार न करता केलेले कृत्य निषेधार्थ आहे.
याबद्दल अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेने तीव्र निषेध व्यक्त करुन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा कामबंद आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा संघटनेचे तालुकाध्यक्ष रणधीर तांबे, शहराध्यक्ष पवन हाडा आदिंनी दिला आहे.
कोविडच्या भयावह संकटातही पालिकेचे सफाई कर्मचारी स्वतःसह कुटुंबियांचा जीव धोक्यात घालून कर्तव्य निभावत आहे.
त्यातच कर्तव्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी साधने उपलब्ध नसतानाही दुसर्यांच्या मदतीने पोहोचत आहे. याचा कोणताही विचार न करता पोलिसांनी निर्दयतेने वागत कोविड सेंटरमधून पर