मनपाच्या दिव्यांची बत्ती गुल; नगरकर सामना करतायत काळोखाचा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-शहरात ठिकठिकाणी विकासकामांचे नियोजन सुरु आहे, तर अनेक ठिकाणी कामे देखील सुरु आहे. यामुळे रस्त्यांवर वाहने, वस्तू आदी ठेवण्यात आलेल्या आहेत.

यातच गेल्या काही दिवसांपासून मनपाचे पथदिवे बंद असल्याने याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला आहे. यामुळे आता याच मुद्द्यावरून स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी आक्रमकपणा अंगिकारला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून पथदिवे बंद असल्यामुळे शहरामध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले असून, महापालिकेने पथदिवे दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे,अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल ,

असा इशारा स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत मनपा आयुक्त शंकर गोरे यांना निवदेन दिले आहे. दरम्यान या निवेदनात म्हटले आहे, की शहरासह महामार्गावरील पथदिवे बंद असल्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता आहे.

तसेच कॉलनी अंतर्गत भागातील पथदिवे बंद असल्याने चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. मनपाच्या माध्यमातून शहरातील पथदिव्यांची देखभाल व दुरुस्तीसाठीची निविदा प्रक्रिया राबविली होती.

मात्र, ती निविदा प्रक्रिया न्यायप्रविष्ठ झाल्यामुळे शहरातील जनतेला किती दिवस अंधारात रहावे लागेल, हे सांगता येणार नाही. त्यासाठी न्यायालयामध्ये महापालिकेने सक्षमपणे बाजू मांडून निविदाप्रक्रियेला चालना द्यावी.

तोपर्यंत महापालिकेने स्वतः बंद असलेले पथदिवे दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अन्यथा आंदोलन केले जाईल, असे कोतकर यांनी म्हटले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24