अहमदनगरमध्ये भरदिवसा खून… आरोपीच्या आवळल्या मुसक्या!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- अहमदनगर शहरातल्या दिल्लीगेट भागात असलेल्या पुरातन बारवेजवळ एका अज्ञात इसमाचा खून करण्यात आला आहे.

दारु पिण्याच्या कारणावरुन हा खून झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.आज (दि. १६) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.

दरम्यान, डोक्यात दगड घालणार्‍या एका संशयीत इसमाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रात्रीच चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

सोनू बिझ्झा नावाच्या तरुणाने हा खून केल्याची प्राथमिक माहिती असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि  दिलीप विरदकर यांचे काही इसमांसोबत बुधवारी सकाळी किरकोळ वाद झाले होते. या वादानंतर सायंकाळी नेप्ती नाका येथे दिलीप यांच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली.

सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर त्याठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. घटनेची माहिती कोतवाली, तोफखाना पोलिसांना मिळताच पथकासह घटनास्थळी रवाना झाले होते.

यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला होता. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24