घरगुती वादातून पत्नीचा गळा आवळून खून

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-नवरा बायको म्हंटले कि, भांड्याला भांडे लागणारच… व वाद होणारच हे नित्याचेच आहे. मात्र अशाच एका किरकोळ वादातून एक मोठी व धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे.

घरगुती कारणातून वादात पत्नीचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत लता संतोष पटोरकर असे मयत महिलेचे नाव आहे.

तर संतोष परसराम पटोरकर (वय.२८ वर्षे.रा.बिबामल ता. धारनी जि.अमरावती ) असे आरोपी पतीचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की,

नगर एमआयडीसी येथील ब्रीज इंडस्ट्रीज प्लाँट नं डी.१५ , सिक्युरीटी कँबीनमध्ये शनिवारी (दि.3 एप्रिल) राञी 11 वाजण्याच्या नंतर रविवारी (दि.4 एप्रिल) दरम्यान आरोपी संतोष परसराम पटोरकर

याने त्यांचे घरगुती अगर वैयक्तीक कारणावरुन त्याची पत्नी लता संतोष पटोरकर हीचा कशानेतरी गळा आवळून तिला जीवंत ठार मारले आहे.

या भागीनाथ सुर्यभान कराळे ( रा.डेंन्टल काँलेज शेजारी धुमाळ माथा वडगाव गुप्ता ता.जि.अ.नगर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील अधिक तपास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि आठरे हे करीत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24