मैत्रीमध्ये दुरावा निर्माण झाल्याने डोक्यात दगड घालून प्रेयसीचा खून !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-मैत्रीमध्ये दुरावा निर्माण झाल्याने प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून प्रियकराने खून केल्याची घटना पुण्यातील भाटघर धरण परिसरात उघडकीस आली.

तरुणी हरवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर चंदननगर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. मनिषा गेडाम (२९,रा.अमरावती) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

याप्रकरणी सागर गुंडवर (३०,रा.अमरावती) याला अटक करण्यात आली आहे. मनीषा व सागर हे महाविद्यालयापासून मित्र आहेत.

मनीषा बीए आणि सागर याने बीकॉम एकाच महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. नोकरीनिमीत्त मनीषा पुण्यात आली होती.

ती चंदननगर येथे पेईंग गेस्ट म्हणून रहात होती. तर सागर अमरावतीमध्ये एका खासगी कंपनीत कामाला होता. तो अमरावतीवरून अनेकदा तिला भेटायला येत होता.

दरम्यान, घटनेच्या दिवशी (१३ मार्च) रोजी सागर अमरावतीवरून दुचाकी घेऊन तिला भेटायला आला होता.

त्याने महत्वाचे बोलायचे असल्याचे सांगत तिला दुचाकीवरून भाटघर धरण परिसरात आडबाजूला नेले.

तेथे त्यांच्यामध्ये वाद झाल्यावर त्याने डोक्यात दगड घालून तिचा खून केला. त्यानंतर दुचाकीवरून त्याने अमरावती गाठले.

दरम्यान, मनीषा खोलीवर न आल्याने तिच्या मैत्रिणीने ती हरवल्याची तक्रार चंदननगर पोलिस ठाण्यात केली होती.

तपासात तिच्या घरच्यांनी अपहरण झाल्याची शक्यता वर्तवून सागरवर संशय व्यक्त केला होता. घटनेपूर्वी सागरने मनिषाच्या अमरावती येथील घरात जाऊन तोडफोड केली होती.

याप्रकरणी त्याच्यावर चांदूर बजार पोलिस ठाण्यात अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24