अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- रिझर्व्ह बँकेची परीक्षा देण्यासाठी औरंगाबाद शहरात गेलेल्या विकास देवचंद चव्हाण (रा. अल्हनवाडी, ता. पाथर्डी) याची शुक्रवारी निर्घृण हत्या करण्यात अाली हाेती.
सिटी चौक पोलिसांनी काही तासांतच संशयित म्हणून पकडलेला ट्रॅव्हल एजंटच मारेकरी असल्याचे निष्पन्न झाले.
शाहरुख खान फिरोज खान (२८, रा. जुना बाजार) असे आराेपीचे नाव आहे. दिव्यांग असलेल्या विकासजवळील ५०० रुपये लुटण्याच्या इराद्याने त्याने परीक्षा केंद्रावर सोडण्याचे आमिष दाखवून दुचाकीवर बसवून कब्रस्तानात नेले.
तेथे मारहाण करून लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, विकासने विरोध करताच त्याने चाकू काढून सपासप वार करत खून करून त्याचा एक हात कापला हाेता.
चीकठलठाणा येथील आयऑन सेंटरवर शुक्रवारी सकाळी ८ वाजता विकासची परीक्षा हाेती.त्यामुळे गुरुवारी रात्री ताे शहरात आला.
बसस्थानकावर मुक्कामासाठी थांबला. पहाटे पाच वाजता शाहरुखने एकटा बसलेल्या दिव्यांग विकासला हेरले. त्याच्याशी बराच वेळ गप्पा मारून विश्वास संपादन केला.
शाहरुख काही महिन्यांपर्यंत एका ट्रॅव्हल्स कंपनीसाठी काम करत होता. मात्र, चार महिन्यांपासून कमिशनवर कोणत्याही वाहनांना प्रवासी मिळवून देत होता. २०१७ मध्ये त्याच्यावर मारहाणीचा एक गुन्हा दाखल आहे.