अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- नगरच्या सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, येथील ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ, संंस्कृतचे अभ्यासक डॉ. मधुसूदन बोपर्डीकर यांचे आज पहाटे निधन झाले.
ते ९० वर्षांचे होते. पेमराज सारडा कॉलेजचे ते माजी प्राचार्य होते. बंदिश सांगितिक अकादमीच्या माध्यमातून त्यांनी नगरमध्ये संगीत चळवळ उभारली.
त्यांनी अनेक शिष्य घडवले. संवादिनी वादनात त्यांचा सखोल अभ्यास होता. याच माध्यमातून त्यांनी संगीताचे हजारो प्रयोग केले.
तसेच महाकवी कालिदास, राष्ट्रपती पुरस्कारासह अनेक पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. असे एक महान व्यक्तिमत्व आज हरपले आहे.