अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- कोपरगाव तालुक्यातील मुस्लिम समाजाने नेहमीच काळे परिवारावर प्रेम केले असून हा मुस्लिम समाज आजही नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिला, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
मुस्लिम समाज कमिटी तसेच बागवान समाजाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कोपरगाव तालुक्यातील मुस्लीम विकास समाजाच्या तालुकाध्यक्षपदी आयुब कादर शेख व शहराध्यक्षपदी साजिद सलीम शेख तसेच कोपरगाव तालुका बागवान बिरादरी समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक मेहमूदखाँ बागवान, फकीराभाई बागवान, सदर सिराजभाई बागवान,
नायब सदर महेराजभाई बागवान, सेक्रेटरी फारुकभाई बागवान, खजिनदार जावेदभाई बागवान या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. काळे म्हणाले, कोपरगाव तालुक्यात मुस्लीम समाजाने सामाजिक एकोपा जपला.
राजकीय, सामाजिक कामात मुस्लिम कमिटी अग्रेसर राहिली असून कोपरगाव तालुका व शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून शहराला दिशा देण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुस्लिम समाजासाठी विविध समाजोपयोगी विकास कामांसाठी ३४ लाख रुपये निधी आमदार आशुतोष काळे यांनी दिल्याबद्दल मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद, मंदार पहाडे, असलम शेख, सलीम पठाण, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, मुन्ना मन्सुरी, फकीर कुरेशी, अॅड. शादाब शेख, मौलाना यासीन मिल्ली, अॅड. अर्शद शेख, असिफ शेख, इमरान बागवान, युसूफ शेख आदी उपस्थित होते.