मुस्लिम बांधवांनी मशिदीऐवजी घरीच नमाज अदा करा !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन असल्याने रविवारी २६ व्या रोजा निमित्ताने साजरी होणारी मोठी रात्र शब-ए-कद्र घरीच साजरी करावी

तसेच १४ मे रोजी होणारी रमजान ईद देखील ईदगाह मैदान किंवा मशिदीत नमाज पठण न करता घरीच नमाज अदा करावी आणि कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुस्लिम समाजाने योगदान द्यावे, असे आवाहन श्रीगोंदे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी केले.

मोठी रात्र, रमजान ईद पार्श्वभूमीवर ढिकले यांनी पोलिस ठाणे हद्दीतील मुस्लिम समाजातील नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, मौलाना यांची सामाजिक अंतर ठेवून बैठक घेऊन माहिती दिली. त्यावेळी ढिकले बोलत होते.

ढिकले म्हणाले, राज्यात तसेच श्रीगोंदे तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने त्याचा मुकाबला करण्यासाठी सरकार लॉकडाऊन मार्फत प्रयत्न करत आहे. अशावेळी सणवार साजरे करताना लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

यावेळी कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने गर्दी टाळून नियमांचे पालन करत साधेपणाने ईद साजरी करणार असल्याचे उपस्थित नगरसेवक, मौलाना यांनी सांगितले. गतवर्षी देखील साधेपणाने ईद साजरी करण्यात आली होती.

यावेळी नगरसेवक निसार बेपारी, मौलाना मोहियोद्दीन आत्तार, अ. रहीम जकाते, आसिफ पठाण, शकील शेख, शब्बीर बेपारी, पोलिस कर्मचारी संतोष कोपनर आदी उपस्थित होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24