अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- गरीब जनतेला कोरोनात मोफत उपचार मिळावेत म्हणून आपल्या निधीमधून ३० लाख रुपये ग्रामीण रुग्णालयासाठी दिले आणि ३० बेड असणारे हे रुग्णालय ५० बेडचे केले.
शिवाय सर्वच्या सर्व बेडस्ना ऑक्सिजन सुविधाही निर्माण करून दिली. श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर असे करून १०० खाटापर्यंतचे उपजिल्हा रुग्णालय करण्यासाठी आपण पाठपुरावा केला.
त्याला यश आल्याचे आमदार लहू कानडे यांनी सांगितले. ७ जून २०२१ च्या शासन निर्णयाद्वारे श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाची श्रेणीवाढ करुन ३० खाटावरून ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय म्हणून त्यास मान्यता मिळाली.
या रुग्णालयाला आमदार निधीमधून कार्डियाक ॲम्ब्युलन्स मंजूर केली. दीड कोटी रुपये खर्चाचा ऑक्सिजन प्लांन्ट मंजूर करून आणला. विजेअभावी तो बंद पडल्यास त्याला बॅकअप म्हणून आमदार निधीमधून २० लाख रुपये देऊन २०० केव्हीचे जनरेटर दिले.
आमदार लहू कानडे यांनी हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांचे आभार मानले. ५० बेड व्यतीरिक्त अधिक ७५ बेड वाढवण्यासाठी विस्तारित इमारतही मंजूर करून घेतली.
त्यासाठी आमदार निधीमधून कानडे यांनी निधी मंजूर केला. ११ रोजी या इमारतीचा पायाभरणी समारंभ होत आहे. त्या इमारतीमध्ये ७५ ऑक्सिजन बेडची सुविधा करण्यात येणार आहे. त्यापैकी २५ बेडचे लहान मुलांसाठीचे कोरोना उपचार केंद्र असेल.