माझा बाप काही खोटा स्वातंत्र्यसैनिक नाही…? पाथर्डीत राष्ट्रवादी भाजपमध्ये घमासान

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- माझा बाप काही खोटा स्वातंत्र्यसैनिक नाही, मी खोट्या दाखल्यावर डॉक्टरची परीक्षा दिलेली नाही. अथवा आमच्या घरातील कोणीच लाचलुचपतच्या जाळ्यात सापडलेली नाही.

मूळात तुमचा दवाखाना पालिकेतील ठेकेदारांचा अड्डा बनला आहे. अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे नगरसेवक बंडुपाटील बोरुडे यांनी भाजपचे पाथर्डीचे नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे यांचे नाव न घेता केली आहे.

पाथर्डी तालुक्यात भाजप व राष्ट्रवादीत सध्या एकमेकांवर जोरदार चिखलफेक केली जात जात असून एकमेकांच्या टीका टिपण्णीला उत्तरे देण्याचा सपाटच लावला आहे.

पुढे बोरूडे म्हणाले की, सामान्य माणसाच्या गरजा पुर्ण करण्यापेक्षा तुम्ही तुम्हाला ज्या कामात पैसे मिळतील अशीच कामे पाच वर्षे केली. त्यामुळे तुम्ही आमच्यावर टिका करण्याचा अधिकार कधीच गमावला आहे.

मी जमिनी खरेदी-विक्री करतो तो माझा व्यवसाय आहे. तुमच्यात बसणारे खरे गुंड आहेत. यावेळी बोलताना शिवशंकर राजळे म्हणाले, ॲड. ढाकणे यांनी पालिका कारभारावर केलेल्या टिकेला लोकप्रतिनिधींनी उत्तर द्यायला हवे होते.

मात्र त्यांच्याकडे उत्तर नसल्याने त्यांनी पत्रकार परीषदेपासुन पळ काढला. तुमच्या बगलबच्यांनी बाजार समितीच्या जागेत अतिक्रमण करून बाजारसमितीचा रस्ता अडवला.

बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचे पाप तुम्ही केले आहे. लोक तुम्हाला पालिकेत धडा शिकवतील. किरण खेडकर म्हणाले, पंचायत समिती भ्रष्टाचाराचे कुरण झालीय.

घरकुल, गायगोठा व विहीरीचे पैसे घेवुन कामे होतात. तुमचे दलाल पंचायत समितीत पैसे गोळा करतात. तुम्हाला सक्षम विरोधक तयार होवु नये यासाठी तुम्ही सतत काम केले.

Ahmednagarlive24 Office