file photo

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  मी गेली अनेक वर्षापासून किर्तन रुपी सेवा करत असून, त्यामधून मी समाजप्रबोधनावर जास्तीत जास्त भर देऊन समाजाला दिशा देण्याचे काम करत आहे.

असे मत समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांनी व्यक्त केले. शेवगाव तालुक्यातील कांबी येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ज्या मातेने आपल्या मुलास सांप्रदायिक रूपाने सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली.

त्या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणासाठी मी उपस्थित राहून किर्तन रूपाने तुम्हाला जे समाज प्रबोधन करत आहे. ते तुम्हाला निश्चितच दिशा देणारे आहे.

असे सांगून आज समाजामध्ये अनेक व्यवसायांना संतांची नावे दिली जातात. ती चुकीची असून असे काम कोणत्याही व्यावसायिकांनी करू नये.

तसेच गाव पुढारी एकत्र आले तर कोरोना महामारीवर मात करणे फार अवघड नसून, यामुळे आपल्या गावातील शाळा, कॉलेज सुरू होण्यास मदत होईल.

त्यामुळे विद्यार्थी शाळेपासून दुरावला गेला आहे. तो पुन्हा शैक्षणिक प्रवाहात येईल. यासह अनेक सद्यस्थितीवर दृष्टांत सांगितले. त्याच सोबत आपल्या खास शैलीत विनोद करून उपस्थित भाविक भक्तांना व ग्रामस्थांना हसवले.