अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- या रस्त्याने जायचे नाही, हा रस्ता आमच्या मालकीचा आहे. असे म्हणून राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील माय लेकाला लाथा बूक्क्यांनी मारहाण करून दगडाने ठेचून मारण्याची धमकी दिली.
ही घटना दिनांक १८ जुलै रोजी घडलीय. अभिजीत बाबासाहेब सत्रे याने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक १८ जुलै रोजी सायंकाळी सात वाजे दरम्यान राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील सत्रे वस्ती परिसरात या घटनेतील आरोपी आले.
ते फिर्यादी अभिजीत सत्रे यास म्हणाले कि, तुम्ही या रस्त्याने जायचे यायचे नाही. हा रस्ता आमच्या मालकीचा आहे. असे म्हणून अभिजीत सत्रे यास शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन ढकलुन दिले.
त्यावेळी त्याची आई पुनम ह्या भांडणाची सोडवा सोडव करण्यासाठी आल्या असता त्यांच्या डोक्यात दगड मारून मारहाण केली. तसेच परत आमच्या नादी लागले तर तुम्हाला दगडाने ठेचून मारुन टाकू. अशी जिवे मारण्याची धमकी दिली.
अभिजीत बाबासाहेब सत्रे राहणार सत्रे वस्ती, वांबोरी. याने वांबोरी येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चंद्रकांत लक्ष्मण पटारे ,
बाबासाहेब चंद्रकांत पटारे, अलकाबाई चंद्रकांत पटारे( सर्व राहणार वांबोरी ता. राहुरी) या तिघांविरोधात मारहाणीचा व जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक दिनकर चव्हाण हे करीत आहे.