ताज्या बातम्या

“माय लॉर्ड, तुम्हीच सांगा, न्यायपालिकांनी तरी आपल्यावर शिंतोडे उडू देऊ…”

Published by
Ahmednagarlive24 Office

मुंबई : INS विक्रांत (INS Vikrant) युद्धनौका वाचवण्यासाठी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी निधी गोळा केला होता. मात्र तो निधी राजभवनापर्यंत (Raj Bhawan) पोहोचलाच नाही असा गंभीर आरोप शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर केला आहे.

त्यानंतर किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर किरीट सोमय्या यांना अटकपूर्व जमीन मंजूर झाला. त्यामुळे सामनाच्या (Saamana) अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे.

सामनाच्या अग्रलेखात म्हंटले आहे की, महाराष्ट्रात (Maharashtra) एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या लोकांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा ताबा घेतलाच आहे. न्यायपालिकांनी तरी आपल्यावर शिंतोडे उडू देऊ नयेत, पण काय करणार ?

मला न्याय हवा असेल तर मी न्यायालयात जाणार नाही, तेथे न्याय मिळत नाही, असे माझी सर न्यायाधिश रंजन गोगाई (Ranjan Gogoi) यांनी म्हटले आहे. सरन्यायाधीशांची ही अवस्था असेल तर सामान्यांचे काय ?

विक्रांत युद्धनौकेच्या नावावर पैसे गोळा करून अपहार करणे हा देशद्रोह नाही काय ? माय लॉर्ड, तुम्हीच सांगा !” अशी जोरदार टीका सामनाच्या अग्रलेखातून केंद्रीय तपास यंत्रणेवर करण्यात आली आहे.

विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या या दोघांनी जनतेचा पैसा लुटला आहे. ज्यावेळी त्यांच्यावरती ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यावेळी दोघेही फरार झाले होते. कोट्यावधी रूपयांचा अपहार करणाऱ्या दोन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जामीन दिल्यानंतर हे सोमय्या पिता-पुत्र पुन्हा प्रकट झाले आहेत.

ज्यांच्यावर पैशाचा अपहार केल्याचा आरोप आहे. न्यायालयाने त्यांना रोज पोलिस स्टेशनला हजेरी लावयला सांगितली आहे असे हे किरीट सोमय्या महाविकास आघाडीतील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार का ? असे प्रश्नही अग्रलेखात उपस्थित करण्यात आले आहेत.

किरीट सोमय्यांनी विक्रांतच्या नावाखाली जनतेचा पैसा लुटला आहे. त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे. आयएनएस विक्रांतच्या नावाखाली जो काही पैसा जमा केला आहे. तो राजभवनात जमा करू असं वचन किरीट सोमय्या यांनी दिले होते.

पण जमा केलेली रक्कम मधल्यामधी गायब झाली. राजभवनाने ती रक्कम आमच्याकडे आली नसल्याचे लेखी सांगितले आहे. पण आपले न्यायालय पैशांच्या अपहाराचा हा पुरावा आहे असे मानायला तयार नाही.

किरीट सोमय्यांच्या वकीलांनी सांगितले की जमा केलेला पैसा राजभवनात जमा केलेला नाही. आरोपीने हे पैसे भाजपच्या कार्यालयात जमा केले आहेत.

भाजपच्या कार्यालयात विक्रांतचा निधी जमा केला व शेकडो लोकांची फसवणूक झाली हे मानायला आमचे न्यायालय तयार नसेल तर आपण कोणत्या युगातून जात आहोत, येणारा काळ किती कठीण आहे, हे लक्षात येईल.

Ahmednagarlive24 Office