अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- ‘माझा तालुका आहे. ही माझी माणसे आहेत’. त्यांच्या आयुष्यात नवनवीन सुख-सुविधा आणणे, त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे, यासाठी मी माझ्या आमदारकीचा प्रत्येक दिवस खर्च करणार आहे.
असे मत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले. पोलिसांसाठी गृह विभागातर्फे नवीन वाहन देण्यात आले. त्याचे लोकार्पन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते झाले.
यावेळी ना. तनपुरे बोलत होते. ते म्हणाले, गेली १५ वर्षे राहुरी तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून येत होते;पण आमदार म्हणून यांनी कधीही पोलीस बांधवांसाठी कुठल्याही सोयी- सुविधा दिल्या नाहीत.
अशी टीका माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचे नाव न घेता केली.आज या तालुक्याचा आमदार म्हणून निवडून आल्याबरोबर नवीन प्रशासकीय इमारत तथा
नवीन पोलीस स्टेशन व पोलिसांच्या सदनिका बनविण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. तसेच पोलिसांसाठी नवीन वाहन गृह विभागामार्फत देण्यात आले आहे.