अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- करोनाच्या काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडू नये म्हणून राज्य शासनाच्या शालेय विभागाने 3 नोव्हेंबर 2020 पासून पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हॉटस्पच्या माध्यमातून स्वाध्याय (डिजीटल होम असेसमेंट योजना) उपक्रम सुरू केला.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर एक लिंक दिली जाते. त्यात आठवड्यासाठी बहुपर्यायी दहा प्रश्नांची प्रश्नावली देऊन ती विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतली जाते. विद्यार्थ्यांनी ती सोडवल्यानंतर लगेच त्यांना त्याचा निकालही ऑनलाईनच मिळतो.
जिल्ह्यात पहिली ते बारावीचे एकूण 7 लाख 77 हजार 711 विद्यार्थी आहेत. त्यापैकी या स्वाध्याय योजनेसाठी 1 लाख 9 हजार 998 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
मराठी, इंग्रजी, उर्दू अशा तिन्ही माध्यमांमध्ये हे स्वाध्याय उपलब्ध आहेत. राज्यातील सर्वच जिल्हे या उपक्रमात सहभागी असून प्रत्येक आठवड्यात जिल्ह्यांची क्रमवारी खाली-वर होते.
सध्या एकोणीसावा आठवडा सुरू असून त्यात नगरचा राज्यात अठरावा क्रमांक आहे. चालू आठवड्यात नगर जिल्हा राज्यात अठरावा क्रमांक असून
लवकरचा हा क्रमांक ओलांडून टॉपमध्ये येण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.